नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी फळ मार्केटमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्केटमधील कचऱ्यात फेकून दिलेली सफरचंदे काही जण गोळा करून ती एपीएमसी मार्केटबाहेर तसेच मुंबई, ठाणे आणि परिसरातील विविध बाजारपेठांमध्ये ₹100 ते ₹200 प्रति किलो दराने विक्री करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये कचऱ्यातून सफरचंदे वेचणारी एक व्यक्ती ही फळे मुंबई, ठाणे आणि इतर भागात विकली जात असल्याचा दावा करताना दिसत आहे.