घोडबंदर रोडवरील मेट्रोच्या खड्ड्यात कंटेनर कोसळला; चालकाची सुखरूप सुटका.घोडबंदर रोडवरील दोस्ती इम्पेरिया समोर मेट्रो ब्रिज प्रकल्पांतर्गत पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या सुमारे १० फूट खोल खड्ड्यात सकाळी कंटेनर कोसळल्याची घटना घडली.या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरूप सुटका केली.कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर मेट्रो प्रकल्पाच्या खड्ड्यात कोसळला.कंटेनरमध्ये सुमारे २५ टन भंगार टायरचा माल असून तो न्हावा शेवा येथून गुजरातकडे जात होता.