आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मराठवाडा आणि विदर्भातील हजारो वारकऱ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात सेवाभावाचं प्रेरणादायी चित्र पाहायला मिळतंय. वारकऱ्यांच्या भोजनाची कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरता भव्य अन्नछत्र उभारण्यात आले आहे. या अन्नछत्रामध्ये दररोज हजारो वारकऱ्यांना प्रेमाने, आदराने आणि भक्तिभावाने महाप्रसादाचे वाटप केले जात आहे...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी....