पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील बहुतांश धरणे भरू लागली असून, डिंभे धरणाचा पाणीसाठा 90 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे लवकरच या धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी.