INDIA आघाडी सध्या ब्लॉक झालीय, Uddhav Thackeray यांचा इंडिया आघाडीवर थेट निशाणा

उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरच नाही तर स्वत: सहभागी असलेल्या इंडिया आघाडीवर थेट शब्दांमध्ये निशाणा साधलाय. इंडिया आघाडी सध्या ब्लॉक झालीय या शब्दात उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या सद्यस्थितीवर अत्यंत मिश्किल आणि गंभीर टिप्पणी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान, उद्धव ठाकरेंनी विरोधकांनाही धारेवर धरलं. दिल्लीतल्या आंदोलनाला तरुणांचा पाठिंबा मिळाला हे विरोधी पक्षांचं अपयश वाटतं असा सवाल राऊतांनी विचारला. तेव्हा हो नक्कीच अपयश आहे असं म्हणत विरोधकांचं अपयश उद्धव ठाकरेंनी मान्य केलं.

संबंधित व्हिडीओ