Dharashiv|'उचलीचे पैसे परत दे,नाहीतर कामावर ये',ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचं अपहरण

ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण.धाराशिव तालुक्यातील पळसप येथील धक्कादायक घटना; मुकादमासह बीड जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल.धाराशिव तालुक्यातील पळसप येथे ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून १६ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.“उचलीचे पैसे परत दे, नाहीतर कामावर ये” असा तगादा लावत मुलाला मारहाण करून बळजबरीने पळवून नेल्याचा आरोप.अपहरणानंतर आरोपींनी मुलाच्या आईला फोन करून “पैसे दे आणि मुलाला घेऊन जा, नाहीतर मुलाला सोडणार नाही”, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद.या प्रकरणी मुकादमासह बीड जिल्ह्यातील चौघांविरोधात ढोकी पोलिस ठाण्यात अपहरणासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल.ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ

संबंधित व्हिडीओ