नाशिक जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील 12 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.... मात्र नांदगाव तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न बरसल्याने तालुक्यातील नाग्या - साक्या , माणिकपुंज हे धरण भर पावसाळ्यात कोरडे ठाक आहे... तर मन्याड धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे. पाऊस लांबल्यास नांदगाव तालुक्यातील शेती सिंचनाबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नाग्या - साक्या धरणातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी..