Kargil Vijay Diwas 2026| 26 जुलै... कारगिल विजय दिवस; भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम...

आज कारगीर विजय दिन.कारगिल विजय दिवस हा भारतासाठी अत्यंत अभिमानाचा आणि शौर्याचा दिवस आहे.१९९९ मध्ये भारताच्या जम्मू-काश्मीर राज्यातील कारगिल, द्रास आणि बटालिक या दुर्गम आणि अतिउंच पर्वतीय भागात पाकिस्तानने घुसखोरी केली... पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या अनेक मोक्याच्या आणि रिकाम्या चौक्यांवर ताबा मिळवला होता.ही घुसखोरी लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्याने त्यांना हुसकावून लावण्यासाठी 'ऑपरेशन विजय' ही मोहीम हाती घेतली... सुमारे ६० दिवस चाललेल्या या अटीतटीच्या आणि भीषण युद्धात भारतीय सैन्याने अदम्य साहस व पराक्रम गाजवला.कारगिल युद्धात ५२७ हून अधिक भारतीय जवानांनी देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले या सर्व शूर जवानांच्या बलिदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस पाळला जातो。

संबंधित व्हिडीओ