धाराशिवच्या कळंबमध्ये महिला हत्या प्रकरणी आत्तापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.आरोपी उस्मान सय्यद आणि मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला एलसीबीनं ताब्यात घेतलंय.या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.दोन्हीही आरोपी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवाशी आहेत.संतोष देशमुख यांना अनैतिक संबंधात अडकवण्यासाठी महिलेला तयार करण्यात आलं होतं.. आणि आता त्याच महिलेची हत्या केल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केलाय. धाराशिवमधील ही महिला असून 5 ते 6 दिवसांपूर्वी तीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केलाय आणि हीच महिला संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप करणार होती असा दावा याआधीही अनेकांनी केलाय.. दरम्यान महिलेच्या हत्येप्रकरणी आता दोन आरोपींना अटक करण्यात आली.