सिडकोच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या विभागाने तोडक कारवाई अधिक तीव्र केल्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालीय.. आज खारघर सेक्टर 5 मध्ये सिडकोच्या पथकाने धडक कारवाई करत 100 रूमची एक अनधिकृत इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केली. ही कारवाई सकाळपासून सुरू होती. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 100 दिवसात सिडकोने 100 हून अधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सिडकोने कोट्यवधी रुपयांची जमीन मोकळी केली आहे.