लोकसभेत आज बहुप्रतिक्षीत वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आलंय, मात्र यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावर ठाकरेंची कोंडी करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु केलेत.दरम्यान वक्फ विधेयकावर अरविंद सावंत यांनी संसदेत पक्षाची भूमिका मांडलीय.विधेयकात काही चुकीचे असेल तर त्याचे समर्थन करणार नाही, भाजपा आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का असं अरविंद सावंत म्हणालेत. यालाच किरण रिजिजू यांनी सावंतांना प्रत्तुतर दिलंय.तसेच फडणवीस आणि शिंदेंनीही ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलंय.