भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला त्या तणावानंतर सगळ्यांच्या मुखी दोन नावं राहिली. त्यातलं एक होतं कर्नल सोफिया कुरेशी. पण याच कर्नल सोफिया कुरेशी बद्दल मध्यप्रदेशच्या मंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे अवघ्या देशामध्ये संतापाची लाट उसळली. कर्नल सोफिया कुरेशी यांनी देशासाठी जे केलं त्याचं कौतुक करणं तर सोडाच वर उलट त्यांचा धर्म यालाच हत्यार बनवत, याला मुद्दा बनवत विजय शहा यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे भाजपची सुद्धा उत्तर देण्याची पंचायत झाले.