संकटकाळात तुर्कीची भारताऐवजी पाकिस्तानला मदत; वर्मावर घाव घालत भारताचं प्रत्युत्तर | NDTV मराठी

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात जेव्हा तणाव निर्माण झाला त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते जागतिक समुदायाकडं. जगातले विविध देश भारत पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतात? कुणाला पाठिंबा देतात याबद्दल चर्चा सुरू होत्या. दोन्ही देशांमधला तणाव चौथ्याच दिवशी निवळला पण इतक्या कमी कालावधीतही काही देशांनी पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला. पाकिस्तानला मदतही केली. तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. शस्त्रास्त्र पुरवली. हे दोनही देश विविध पातळ्यांवर भारताशी चांगले संबंध राखून होते. पण या दोन देशांनी पाकिस्तानला मदत केल्यामुळं आता मात्र भारतात या दोन्ही देशांच्या विरोधात तीव्र भावना आहेत. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे व्यापार आणि पर्यटनावर. पाहूयात याच संदर्भातला रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ