पहलगाम मधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. आणि या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधु राबवत पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलंय. भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक देखील केला. या एअरस्ट्राईक ला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्करावर सर्वच तळावरून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.