#Kolhapur #CircuitBench #Judiciary #bhushangawai Kolhapur | गेल्या 42 वर्षांपासून सुरू असलेल्या सर्किट बेंचच्या मागणीला आज अखेर यश आले आहे. आज, 17 ऑगस्ट 2025 रोजी, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे ऐतिहासिक उद्घाटन होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचचे उद्घाटन पार पडेल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ न्यायाधीश आणि राजकीय नेते उपस्थित राहणार. या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील लोकांना जलद आणि सुलभ न्याय मिळवणे शक्य होणार आहे.