भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय...सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे ...देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण, तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे...रोहित पवारांनी फडणवीस सरकारव निशाणा साधलाय...