Raj Thackerayयांच्या वक्तव्यानंतर हातात काट्या,दांडे घेऊन बारची तोडफोड; पनवेलमध्ये परिस्थिती काय?

शेकापच्या वर्धापनदिनानिमित्त सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत जिथे बार बंद असायला हवे तिथे अनधिकृत बार कसे सुरु असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट रायडर्स बारवर धडक दिली.. यावेळी हातात काट्या आणि दांडे घेऊन संतापलेल्या मनसैनिकांनी बार फोडला.

संबंधित व्हिडीओ