Himachal Pradesh मध्ये काही भागात यलो अलर्ट, Varanasiमध्ये पूर परिस्थिती आणखी बिकट | NDTV मराठी

हिमाचल प्रदेशातील काही भागांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार काही भागांत पावसाची तीव्रता कमी होईल, परंतू बिलासपूर,मंडी, सोलन आणि शिमला येथील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचा आणि पूर आणि भूस्खलनप्रवण क्षेत्रांपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनानी दिलाय.वाराणसीत पूर परिस्थिती आणखी बिकट झालीय.. गंगा नदीची पाणी पातळीत धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली असून, सर्व 84 घाट आता पाण्याखाली गेले आहेत आणि नदीचे पाणी प्रत्येक तासाला झपाट्याने वाढत आहे... गंगेची उपनदी असलेल्या वरुणा नदीत पाण्याचा उलट प्रवाह झाल्याने तिच्या काठावर असलेल्या 12 शहरी वॉर्डांमध्ये पूर आला आहे, ज्यामुळे घरे आणि रस्ते जलमग्न झाले असून रहिवाशांना स्थलांतर करावे लागले आहे.जिल्हा प्रशासन, पोलिस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त पथकांद्वारे बचाव आणि मदत कार्य सुरू आहे

संबंधित व्हिडीओ