कुणी आरे केलं तर त्याला कारे करा पण कुणाला उगीच अंगावर घेऊन नका.मात्र कुणी अंगावर आलाच तर शिंगावर घ्यायला मागं पुढं पाहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.अलिबाग इथं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय.. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी आमच्याही नादी लागू नये...हे सर्व करत असताना कायद्याची चौकट मोडू नका असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितलं आहे.