राज्यात सध्या महायुतीचे सरकार असले तरी सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष पाहायला मिळालेला आहे. मंत्र्यांचा एकमेकांच्या खात्यांतील हस्तक्षेप आणि खात्यांना मिळणारा निधी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या तिन्ही पक्षांतील अनेक नेत्यांनी आतापर्यंत नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान, आता पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील माझ्या खात्याकडे बजेट नाही अशा शब्दांत आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच शासनाने आम्हाला थोडी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.