बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे नदीत पोहायला गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना घडलीय.करण भोमळे आणि वैभव फुके असं दोघांचं नाव आहे.त्यांना नदी पात्रातून बाहेर काढण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेले नाही. दरम्यान घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.