पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सातासमुद्र पार पळाला.त्याने थेट लंडन गाठलयं. शिक्षणात टॉप केलेला हा तरूण गुंडगिरीकडे वळला, त्याने कोथरूडमध्ये दहशत निर्माण केली.आणि इतकी माया जमवली की, मुलगाही लंडनलाच शिक्षण घेऊ शकेल. त्यामुळेच त्याच्या संपत्तीवरून आणि परदेशात पळ काढण्यावरून पोलीस आणि राजकारण्याचा वरदहस्त आहे का असा प्रश्न विचारला जातोय.