Paithan Flood | तब्बल 3000 नागरिकांचे पैठण शहरातील नाथ हायस्कूलमध्ये स्थलांतर, जेवणाची व्यवस्था नाही

पैठणच्या जायकवाडी धरणातून दोन लाख 54 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.. त्यामुळे शहरातील अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरलंय.. रात्रीतून हा धोका आणखी वाढण्याची परिस्थिती असल्याने स्थानिक प्रशासनाकडून तब्बल 3000 नागरिकांचे पैठण शहरातील नाथ हायस्कूलमध्ये स्थलांतर करण्यात आलं... पण अजूनही अनेक लोकांना त्याठिकाणी जागा उपलब्ध झाली नाही.. तर ज्यांना शाळांच्या खोलीत ठेवण्यात आले आहे त्यातील अनेक लोकांची जेवणाची कोणतेही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच लहान मुलांना देखील जेवण मिळत नसल्याचे दिसून येतंय..

संबंधित व्हिडीओ