तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलपती तसा नेहमी चर्चेत असतो तो त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या चाहत्यांमुळे... मात्र शनिवारी तो चर्चेत आला तो त्याच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे... विजय थलापतीच्या पक्षाची करुर इथं एक रॅली आयोजित करण्यात आली होती. तिथं विजयही उपस्थित होता. रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. विजय बोलत असतानाच अचानक चेंगरा चेंगरी झाली आणि तब्बल ३९ जणांचा मृत्यू झाला. नेमकी ही चेंगराचेंगरी कशी झाली आणि कोण जबाबदार आहे या दुर्घटनेला... यानंतर तामिळनाडूतील राजकारण कसं रंगलंय पाहूया एक रिपोर्ट.....