मुंबईकरांसाठी आजचा दिवस तारेवरची कसरत करणारा ठरलाय. मध्य रेल्वे मार्ग तब्बल १० तास खोळंबला होता..सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली..एवढच नाही तर मध्य रेल्वेच्या या ढिसाळ कारभारामुळे तीन प्रवाशांना आपला गमवावा लागलाय. भांडुप स्थानकात एसी लोकलच्या धडकेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. भांडुपच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर उतरून तीन नंबर आलेली गाडी पकडायला जाताना या तरुणाचा मृत्यू झालाय. साहिल थिटे असं या तरुणाचं नाव आहे. तर घाटकोपर, विक्रोळी दरम्यान आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय. या दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलंय. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाहीय.