मध्य रेल्वे १० तास खोळंबली होती..सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली.. मध्य रेल्वेच्या या ढिसाळ कारभारामुळे तीन प्रवाशांना आपला गमवावा लागलाय. भांडुप स्थानकात एसी लोकलच्या धडकेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. भांडुपच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर उतरून तीन नंबर आलेली गाडी पकडायला जाताना या तरुणाचा मृत्यू झालाय. साहिल थिटे असं या तरुणाचं नाव आहे. तर घाटकोपर, विक्रोळी दरम्यान आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय. या दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात आणण्यात आलंय. दरम्यान या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाहीय.
Central Railway | Operations back to normal after 10 hours; Mumbaikars hit by train disruptions