छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुख्य डाकघराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका निनावी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीच्या सत्रामुळे एकच खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाला आहे. या कार्यालयात बॉम्बशोधक पथकाकडून प्रत्येक गोष्टीची चौकशी आणि तपासणी केली जात आहे. तसेच स्कॅनिंग केली जात आहे. मात्र आतापर्यंत काहीही मिळून आलेलं नाही.