वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार ढगफुटीसदृश्य पावसानं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेत जमिनीमधील हजारो हेक्टर वरील खरिपाची सोयाबीन,तूर,कपाशी,हळद यासह भाजीपाला पिकांचं होत्याचं नव्हत झालं आहे. पीक नुकसानीमुळं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन बातचीत केलीय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.