नाशिकमधील बाप्पाचा पहिला आगमन सोहळा पार पडतोय. संबळ वादन आणि गोंधळीच्या रूपातील ढोल वादक सर्वांचं लक्ष वेधून घेतायत. गणेशोत्सव आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिक मधील पहिला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा युवक उन्नती मंडळाचा 'भद्रकालीचा राजा' रविवार कारंजा परिसरातून पुढे मार्गस्थ झाला आहे.. नाशिक ढोलच्या 7 विविध पथकांच्या दोलवादनाच्या तालावर वाजत गाजत ही मिरवणूक काढली जात असून ठिकठिकाणी नाशिककरांच्या बाप्पावर पुष्पवृष्टी करत स्वागत केलं जातंय.... यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची 16 फूट मूर्ती असून रथाला महालक्ष्मी मातेच्या मंदिराची आरास करण्यात आली आहे. संबळ वादन आणि गोंधळीच्या रूपातील ढोल वादक सर्वांच लक्ष वेधून घेतायत.