काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले होते.त्यानंतर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलं.निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही, आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी ना कुणी विरोधक आहे, आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत, असं यावेळी निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं. तर राजकीय पक्षांनी या 15 दिवसांमध्ये त्रुटी सांगाव्यात असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं.