मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी करून कामाच्या गतीचा आढावा घेतला…या पाहणीदरम्यान प्रकल्पातील स्टील ब्रिज, केबल-स्टेड पूल, डबल डेकर रस्ता, तसेच विविध इंटरचेंज आणि कनेक्टर्स यांची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली…मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, सिग्नल-फ्री मार्ग तयार करून पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुलभ करण्यावर भर दिला जात आहे…