विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ सध्या फार चर्चेत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात दिवंगत गायिक आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबाबत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी कागदावर लिहलेलं भाषण वाचतानाही नार्वेकरांची चांगलीच भंबेरी उडाली. दरम्यान राहुल नार्वेकरांनी मराठीची चिरफाड केल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय. लिहून दिलेलंही नीट वाचता येत नाही.. नार्वेकरांचं मराठी वाचन पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही एकाच वेळी दाटून आले अशी टीका राज ठाकरेंनी केलीय. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राज ठाकरेंनी निशाणा साधलाय.