अमेरिकन न्यायव्यवस्थेकडून पुन्हा एकदा अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना दणका बसलाय. ट्रम्प यांचा एक निर्णय अमेरिकन न्यायालयानं अवघ्या ६ दिवसांतच उलटवला.ट्रम्प यांनी १८ सप्टेंबर रोजी सीएनएनसह तीन मीडियांना व्हाईट हाऊसमध्ये बंदी घातली होती. तर अमेरिकन टीव्ही नेटवर्कनंही ट्रम्प यांच्या कार्यक्रमावर बंदी घातली होती. या वृत्तसंस्थांनी न्यायालयातही दाद मागितली होती. त्यावर फेडरल न्यायालयानं ट्रम्प यांच्या निर्णयाला १४ दिवसांची स्थगिती दिली आहे. माध्यमांवर घातलेली बंदी अमेरिकेच्या संविधानाविरोधात असू शकते, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. ट्रम्प यांनी या वृत्त संस्थांवर फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप करत व्हाईट हाऊस बंदी घातली होती.