चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज अमेरिकेत दाखल झाले. ११ वर्षांनंतर जिनपिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर स्वतः त्यांचे स्वागत केलं.ट्रम्प यांच्यासोबत फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प देखील उपस्थित होत्या. शी यांच्यासोबतही त्यांच्या पत्नी पेंग लियुआन उपस्थित होत्या. एखाद्या विदेशी नेत्याच्या स्वागतासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट विमानतळावर जाणे ही सामान्य बाब नाही.
यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये ट्रम्प यांनी अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे एअरफिल्डवर स्वागत केले होते.यानंतर व्हाइट हाऊसमध्ये शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी पेंग लियुआन यांच्या सन्मानार्थ शासकीय मेजवानी आयोजित केली जाईल.