भिमाशंकरमध्ये ठाकरेंच्या आमदाराला CM Fadnavis यांचं प्रपोजल; याचसंदर्भात बाबाजी काळेंसोबत खास संवाद

पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हलक्या-फुलक्या वक्तव्याने मोठी राजकीय चर्चा रंगली आहे…विकास कामांची पाहणी करत असताना फडणवीस यांनी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे पाहत "आपण प्रपोजल दिलंय असं म्हणतात" अशी मिश्किल टिप्पणी केली… आणि यानंतर उपस्थितांमध्ये एकच हास्याचा फवारा उडाला…मात्र, या एका वाक्यानेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे… विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकमेव आमदार असलेले बाबाजी काळे यांच्यावर कोणते राजकीय प्रस्ताव आलेत का… अशा चर्चांना उधाण आलं आहे…

संबंधित व्हिडीओ