अंबरनाथ मधील शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा हत्येचा कट रचला जात होता असं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलंय. स्वतः बालाजी किणीकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. पंधरा दिवसांपासून ही व्यूहरचना केली जात होती आणि आता ठाण्याच्या गुन्हे शाखेनं दोन जणांना या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.