गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे तर अनेक भागामधील जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झालं आहे.