राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी चौंडी येथील जाहीर सभेत शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे.येत्या 8 ते 10 दिवसांत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल', असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता.