उत्तराखंडमधील चंपावत येथे ऐतिहासिक श्री रीठा साहिब गुरुद्वाऱ्याच्या जोड मेळ्यात मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे. लदिया आणि रतिया नद्यांच्या संगमाजवळ अचानक पावसामुळे जलस्तर वाढल्याने सुमारे 50 ते 60 श्रद्धाळू आणि काही वाहने नदीच्या मधोमध अडकली होती.मात्र, घटनास्थळी आधीच तैनात असलेल्या एसडीआरएफच्या टीमने तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि वेगवान कारवाई करत सर्व अडकलेल्या श्रद्धाळूंना सुरक्षित बाहेर काढले. कठीण परिस्थितीतही धाडस आणि तत्परता दाखवत केलेल्या या रेस्क्यूमुळे मोठा अपघात टळला आहे.सध्या राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अशा घटनांचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.