Pune Methanol Liquor Case| विषारी दारु कांडामुळे पुणे जिल्हा हादरला; आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू

पुणे जिल्हा विषारी दारु कांडामुळे हादरला आहे. विषारी दारुमुळे आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय.राजू अवचरे , राजेंद्र टेपो, महेंद्र ओव्हळ असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.. दोघांचा खासगी रुग्णालयात तर एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना झाला असल्याची माहिती मिळतीय.अधिक नफा कमावण्यासाठी आरोपी दारूमध्ये मिथेनॉल मिसळत असल्याचा प्राथमिक दावा पोलिसांनी केला आहे.मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून त्यामुळे दृष्टी जाणे, किडनी निकामी होणे आणि मृत्यू ओढवतो.या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. ज्या ठिकाणाहून ही विषारी दारू विकली गेली, तिथे छापे टाकून साठा जप्त करण्यात आला आहे. मुख्य आरोपींसह या रॅकेटमधील इतरांचा शोध पोलीस घेत आहेत.दरम्यान, विषारी दारू पिल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ