बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय, समाधान खिंडकर यांना बंदूक दाखवत धमकवल्याच्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, समाधान खिंडकरांनी केलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या मित्रांसह बीडमधील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते तिथे धनंजय देशमुख आणि रील स्टार रविराज साबळे उपस्थित होते, समाधान खिंडकर हे रविराज साबळेंना मोबाईलमधील एक व्हिडीओ दाखवत असताना धनंजय देशमुखांच्या अंगरक्षकाने मोबाईल हिसकावला आणि त्यानंतर धनंजय देशमुखांनी समाधान खिंडकरच्या दिशेने बंदूक रोखून धमकावल्याची तक्रार दिलीय, आणि यानुसारच गुन्हा दाखल झाला आता या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलंय.दरम्यान, धनंजय देशमुख त्यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप अटक झाली नाहीय.. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी समाधान खिंडकर यांनी केलीय.. नेमकं त्या रात्री ढाब्यावर काय घडलं? बंदूक रोखल्याचा आरोप कितपत गंभीर आहे? आणि पोलिसांची पुढील भूमिका काय असणार? या सर्व बाबीवर समाधान खिंडकर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी..