Dharashiv| तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, दर्शनासाठी लागतोय 3 ते 4 तासांचा वेळ

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. अधिक जेष्ठ पौर्णिमा आणि रविवारची सुट्टी एकत्र आल्याने राज्यभरातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या असून देवीच्या दर्शनासाठी तब्बल तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानच्या वतीने व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले असून भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून रांग व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि वैद्यकीय मदत याकडेही प्रशासन लक्ष ठेवून आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ