Bandra अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी कट रचला? अतिक्रमण करण्यात आलेल्या ठिकाणाहून घेतलेला आढावा

मुंबईच्या लोकलसह अणुऊर्जा केंद्र उडवण्याचा मोठा कट उधळण्यात आलाय. मात्र या दहशतवादी कटाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय.. वांद्रे पूर्वमध्ये गरीबनगर भागातल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. याच कारवाईचा बदला घेण्यासाठी हा कट आखला होता अशी माहिती सूत्रांनी दिलीय. अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान तैनात असलेले पोलीस कर्मचारी या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. पाकिस्तानमध्ये बसलेला मुन्ना झिंगडा आणि ISIचा हँडलर शहजाद भट्टी यांच्याकडून या दहशतवाद्यांना थेट आदेश मिळत होते अशीही माहिती समोर आलीय.दरम्यान, अतिक्रमण कारवाई करण्यात आली त्याठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी…

संबंधित व्हिडीओ