Bhandara मध्ये अवैध दारूप्रकरणी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई; धडक कारवाईत 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भंडारा जिल्ह्यातही 'ऑपरेशन फ्लश आऊट'च्या नावाखाली अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईमुळे पोलिसांची पाठ थोपटली जात असली तरी एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे... भंडारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर छापेमारी करत 32 गुन्हे दाखल केले आणि 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 50 अधिकारी आणि 300 कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. मात्र या कारवाईने अवैध धंदे उघडकीस येण्यापेक्षा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय एका दिवसात उभा राहत नाही. हे अड्डे अनेक दिवसांपासून सुरू होते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

संबंधित व्हिडीओ