सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज केज आणि कळंब पोलिसांची भेट घेणार आहेत.संतोष देशमुख यांचे कळंब येथील महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचे दाखवण्यासाठी कोणत्या महिलेचा वापर केला जाणार होता? कळंब येथील त्या महिलेचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी धनंजय देशमुख पोलिसांना करणार आहेत.कळंब धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचीही धनंजय देशमुख भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार आहेत.