सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन मंत्री धनंजय मुंडे सध्या वादात सापडले आहेत. हा मुद्दा चर्चेत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा आणखी एक पुरावा समोर आणला आहे.