Global News|इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांच्या घोषणेनंतर गेल्या 24 तासात 22 जणांचा मृत्यू

इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी गाझामधील संघर्षाला आता पुन्हा एकदा नवीन उभारी दिलीय. संपूर्ण गाझावर नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायली लष्करानं कारवाई सुरु केल्याची घोषणा बेजामिन नेतन्याहूंनी केलीय. सध्या गाझापट्टीच्या 75 टक्के भागावर इस्रायली लष्कराचा ताबा आहे. उरलेल्या 25 टक्के भागात हमासचं नियंत्रण असून तिथेच गाझामधील बहुतांश गाझावासिय स्थलांतरीत झालेले आहेत. इस्रायली लष्करानं केलेल्या अन्नकोंडीमुळे गाझातील नागरिकांची दररोज उपासमार होतेय. गेल्या 24 तासात 11 लोकांचे भूकबळी गेलेत. गेल्या वर्षभरातील भूकबळींचा आकडा एक हजाराच्या वर गेलाय. 22 महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धात जवळपास 61 हजार लोकांचा मृ्त्यू झालाय. पण हा नरसंहार थांबवायचा असेल तर हमासला पूर्णपणे संपवल्याशिवाय पर्याय नाही असं नेतन्याहूंनी आज त्यांच्या देशाला संबोधित करताना म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ