Dharashiv महिला हत्या प्रकरण|मृतदेहाशेजारी बसूनच आरोपीनं जेवण केलं, NDTV मराठीच्या हाती मोठी माहिती

कळंब येथील महिला हत्या प्रकरणातील आरोपीची थरारक माहिती समोर.महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहा सोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला.पोलीस सूत्रांची माहिती.मृतदेहा शेजारी बसूनच त्यांन जेवनही केलं, मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला.त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला.रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा.काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं कळतंय.22 मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ