एकनाथ शिंदेंची दिल्ली भेट फसली का, अशी चर्चा आता सुरू झालीय... कारण शिंदेंच्या तक्रारी ऐकून घेतल्या असल्या तरी राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा मेसेज अमित शाहांनी दिलाय. एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत... तिथलेच नेते भाजप पळवत असल्यानं शिंदेंच्या ते जिव्हारी लागलं होतं... आणि म्हणूनच शिंदेंनी तातडीनं दिल्ली गाठली होती... या भेटीत रवींद्र चव्हाणांची तक्रार शिंदेंनी केलीच... पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंबद्दलही एक प्रश्न विचारला.... तर तिकडे उद्धव सेनेनंही शिंदेंच्या दिल्ली भेटीवरुन चिमटे काढलेत.... पाहुया शिंदे-शाह भेटीची इनसाईड स्टोरी आणि शिंदेंची दिल्ली भेट का फसली