राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नागपूर काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष आहे... जागावाटप, उमेदवारी आणि गटबाजीवरून माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप होतायत.. नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचलाय. शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमधून बाहेर पडलेत. याबद्दल काँग्रेस नेतृत्वाला विचारलं असता, प्रदेशाध्यक्ष म्हणतायत, असं काही घडलेलं नाही... कुणीही राजीनामे दिले नाहीत... त्यामुळे ग्राऊंड रिअॅलिटी प्रदेशाध्यक्षांना माहीतच नाही का, असा प्रश्नही आहे... पाहुया नागपूरमध्ये काँग्रेसची एवढी वाट का लागलीय